बेळगाव जिल्हा बुक सेलर्स ऍण्ड स्टेशनरी असोसिएशनची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
मागील वर्ष-दीड वर्षापासून पुस्तक विक्री व स्टेशनरी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे विपेत्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. एकीकडे ऑनलाईन शाळा-कॉलेज सुरू असली तरी अद्याप स्टेशनरी दुकाने उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. प्रत्येक क्षेत्रासाठी स्टेशनरी अत्यावश्यक असल्याने दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा बुक सेलर्स ऍण्ड स्टेशनरी असोसिएशनने पत्रकार परिषदेद्वारे केली.
दुकाने जरी बंद असली तरी विजेचे बिल, कर, कामगारांचा पगार, दुकान भाडे, बँकेचे कर्ज हे द्यावेच लागत आहे. परंतु या दुकानदारांना सरकारकडून कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. बांधकाम, उद्योग, सरकारी विभाग सुरू असल्याने त्यांना स्टेशनरीची आवश्यकता भासत आहे. हे सर्व उद्योग अत्यावश्यक असून, स्टेशनरी दुकाने सुरू करण्यासही सरकारने परवानगी द्यावी. शाळा-महाविद्यालये ऑनलाईन सुरू असल्याने विद्यार्थी-शिक्षकांनाही स्टेशनरीची आवश्यकता भासत आहे. परंतु दुकाने बंद असल्याने त्यांची गैयसोय होत आहे.
सरकारकडून प्रत्येक उद्योग व कर्मचाऱयांना कोविड पॅकेज देण्यात आले आहे. परंतु स्टेशनरी दुकानदारांना कोणतीही मदत अथवा विजेच्या बिलात, बँकेच्या कर्जात मुभा देण्यात आलेली नाही. यामुळे स्टेशनरी दुकानदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्यांना लवकर दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष सुभाष इनामदार, उपाध्यक्ष मकरंद केशकामत, सेपेटरी सुरेश जवळकर, उपसेपेटरी दुंडप्पा जिगजिनी, खजिनदार आदीनाथ हिरेमठ, सदस्य विजय कामत, काशिनाथ जिगजिनी यांसह इतर सदस्य उपस्थित होते.