बंगालमध्ये लढवतोय निवडणूक ः ममता बॅनर्जीवर अनेक आरोप
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत उत्तर दिनाजपूर कीकी करनदीघी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील सर्वात मोठा नेता संबोधिले आहे. 615 कोटींच्या मालमत्तेचा मालक असूनही पूर्वाश्रमीचा नक्षलवादी एका भाडय़ाच्या घरात राहत आहे. पंतप्रधान मोदींनी भारताच्या अनेक समस्या सोडविल्या असल्याचे बिनॉय कुमार दास या अपक्ष उमेदवाराचे मानणे आहे.
पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय नेते आहेत, त्यांना काश्मीर समस्या सोडविली, राम मंदिर वाद संपुष्टात आणून तेथे मंदिराची उभारणी सुरू केली आहे. सीमेवर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. तर ममता बॅनर्जी केवळ बंगालची लूट करत आहेत. तृणमूल काँग्रेसने सर्वसामान्य लोकांवर मोठे अत्याचार केले आहेत. पंचायत निवडणुकीदरम्यान तृणमूलकडून उमेदवारांचे अपहरण करण्यात आले होते अशी टीका दास यांनी केली आहे.
सध्याचे नक्षलवादी भांडवलदारांचे गुलाम
सद्यकाळातील नक्षलवादी हे भांडवलदारांचे गुलाम आहेत. सर्वजण कमिशन मिळवून स्वतःचे खिसे भरत असल्याचा दावा बिनॉय यांनी केला आहे. 650 कोटी 82 लाख 57 हजार रुपयांच्या मालमत्तेचे मालक असलेले बिनॉय आजही भाडय़ाच्या घरात राहतात.