बेंगळूर/प्रतिनिधी
बुधवारी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर बसवराज बोम्माई यांनी राज्यातील पूर आणि कोरोना ही आव्हाने आहेत. त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले.
बसवराज बोम्माई यांनी “मला मुख्यमंत्री म्हणून राज्यसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी कर्नाटकातील सर्व नागरिक आणि भाजप नेत्यांचे आभार मानू इच्छितो. मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि आमचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांचे मी आभारी आहे. माझे प्रथम प्राधान्य आहे ते राज्यातील पूर आणि कोरोना साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवणे आहे, ” असे बोम्माई यांनी राजभवनात पत्रकारांना सांगितले.
ते पुढे म्हणाले की, त्याचे सरकार सर्वत्र साथीच्या आजारात गोरगरीब, शेतकरी व आरोग्य सेवा प्रणालीच्या उन्नतीसाठी काम करेल. कर्नाटकातील लोकांचा माझ्यावर असलेला विश्वास मी राखून ठेवीन, असेही ते पुढे म्हणाले.