मुंबई
पेटीएम आयपीओत पैसा गुंतवणूक केलेल्यांना सध्या नुकसानीचा सामना करावा लागतो आहे. पेटीएमचे समभाग गुरूवारी लिस्टींग झाल्यानंतर 20 टक्केपर्यंत लोअर सर्किट लागले आहे. घसरण मात्र सोमवारीदेखील सुरूच राहिली होती. समभाग सध्या 14 टक्के घटून 1343 रुपयांवर आले आहेत. समभाग लिस्ट झाल्यानंतरच्या दोन दिवसांच्या काळात कंपनीचे समभाग 35 टक्के इतके घसरण नोंदवत होते.