नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल आणि डिझेलचे दर शुक्रवारीही वाढले आहेत. इंडियन ऑईल, एचपीसीएल आणि बीपीसीएल या सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलिटर 30 पैशांनी वाढ केली. त्याचबरोबर डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. या महिन्यात आतापर्यंत सातवेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यानंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.54 रुपये आणि डिझेलची किंमत 92.12 रुपये प्रतिलिटरवर पोहोचली आहे. तसेच मुंबईत पेट्रोलची किंमत 109.54 रुपये आणि डिझेलची किंमत 99.22 रुपये प्रतिलिटर झाली आहे.