प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगाव शहरात दिवसेंदिवस विविध भागात कोरोना रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात बुधवार दि.०५ ते शनिवार ८ ऑगस्ट हे चार दिवस शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आला असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी दिली.
पेठ वडगाव शहरात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी बुधवार दि.५ – ८ तारखेपर्यंत शंभर टक्के लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊन काळात दुध डेअरी सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी पाच ते सात या वेळेत चालू राहील. मेडीकल दुकान, शेती भांडार केंद्र तसेच सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचीकीत्सालय तसेच बँका, एटीएम त्यांचे नियोजित वेळेत सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरवापर करून चालू राहतील. तसेच वर्तमानपत्रे वितरण, पेट्रोल पंप फक्त अत्यावशक सेवेतील शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरविणारी वाहने चालू राहिल, अंत्यविधी कार्यक्रमातील दहा नागरिकांना उपस्थित राहता येईल, कोणीही अत्यावश्यक कामा शिवाय घराबाहेर पडू नये. अन्यथा संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांनी आपली काळजी घेण्याच्या दृष्टीने मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, हात साबणाने स्वच्छ धुवा, पाण्याची वाफ दिवसातून तीन वेळा घ्या, अर्सेनिक अल्बम या औषधाचेडोस घ्या, दुधामध्ये हळद टाकून उकळून दिवसातून तीन वेळ घेण्यात यावे. तसेच आजारी व्यक्तीने कोणाचे संपर्कात न येत स्वतंत्र राहून काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.