प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयातील पेडणे आणि मांदे या दोन मतदारसंघात होणाऱया आजच्या विधानसभा निवडणुकीसाठी सरकारी निवडणूक यंञणा सज्ज झाली आहे. पेडणे मतदारसंघात 33145 तर मांदे मतदारसंघात 32655 मतदार आहेत.
पेडणे तालुक्मयातील पेडणे मातदारसंघात एकूण 51 बुथवर सरकारी यंञणा सायंकाळी रवाना झाली. तर मांदे मतदारसंघातील 48 बुथवर सरकारी यंञणा सज्ज झाली असून पेडणे आणि मांदे या दोन्ही मतदारसंघात प्रत्येक बुथवर 7 निवडणूक अधिकारी ,कर्मचारी आणि त्यांना सहाय्य करणारे कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. एकूण 99 बुथांवर 693 कर्मचारी यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केल्याची माहिती पेडणे मामलेदार यांनी अनंत मळीक यांनी दिली. पेडणे तालुक्मयातील दोन्हीही मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनातात केले असून गोवा पोलीस तसेच राखीव पोलीस दलही तैनात आहे.