रेती काढण्यासाठी वापरण्यात येणाऱया दोन होडा ताब्यात घेत सहा उत्तर प्रदेश येथील रेती कामगारांना अटक , तर साडेचार लाख रुपये किंमतीचे साहित्य ताब्यात
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे पोलिसांनी तेरेखोल नदीपाञात पोरस्कडे येथे बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱयावर कारवाई करत रेती काढण्यासाठी वापरण्यात येणाऱया दोन होडा ताब्यात घेत सहा उत्तर प्रदेश येथील रेती कामगारांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करत त्यांना अटक केली. या रेती उत्खनासाठी वापरण्यात येणाऱया मालमत्तेची किंमत साडेचार रुपये होत असून ते सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आले.
पेडणे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोरस्कडे येथे तेरेखोल नदीत बेकायदेशीर रेती उत्खनन सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यावर कारवाई करण्यासाठी खास टिम तयार करत या टिम मध्ये निरीक्षक जिवबा दळवी, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, उपनिरीक्ष प्रफुल्ल गिरी, का?न्स्ट?बल स्वप्नलि शिरोडकर, समीर नईबागकर, ब्रह्मानंद पोळजी व विनोद पेडणेकर या टिमने बेकायदेशीर रेती काढणा-यावर कारवाई केली. या कारवाईत सुनील कुमार , श्रीनिवास शहानी, अखिलेश सहानी, रामशिष सहानी , अजिंक्मयकुमार राजभर सर्व राहणारे उत्तर प्रदेश तर गोविंद पासवान राहणारा बिहार यांना ताब्यात घेत त्यांच्यावर बेकायदेशीर खनीज उत्खनन कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
पेडणे पोलिसांनी नदीपरिवाहन खात्याला पञ लिहून दोन्ही बेकायदेशीर होडय़ाचे परवाने रद्द करुन रेती व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई तसेच ताब्यात घेतलेल्या रेतीचा विल्हेवाट लावण्यासाठी पञ लिहिले असल्याची माहिती पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.
तेरेखोल नदी मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर रेती उत्खनन , इतर व्यावसायिकावर कारवाई पेडणे पोलिस करणार का ? कि पोरस्कडे केलेली कारवाई हे नाटक ?
तेरेखोल नदीपाञात बेकायदेशीर मोठय़ा प्रमाणात रेती उत्खनन सुरु आहे. विविध भागात बेकायदेशीर रेती काढली जाते. यासाठी महिन्याला सरकारी यंञणेला हजारो रुपये हप्ता रेती व्यवसायिक देतात. पोरस्कडे येथील कारवाई हा फक्त देखावा कि ती खरोखरच कारवाई असा प्रश्न नागरिक करत असून पेडणे तालुक्मयातील सरकारी यंञणा या बेकायदेशीर रेती व्यवसायाला खतापाणी घालत असून सराकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून हा व्यावसाय सुरू आहे.
पैसे सरकारी अधिकारी घेतात कि ते राजकर्ते यांना पुरविले जातात?
तेरेखोल नदीपाञातील बेकायदेशीर रेती काढण्यासाठी प्रत्येक होडीमागे रेती काढणारा व्यावसायिक हा दरमहिन्याला हप्ता मोठय़ा प्रमाणात देतो.हे सर्व पैसे सरकारी यंञणा गिळंकृत करतात की राजकर्ते यांना त्यातील वाटा असतो असा प्रश्न नागरिक करत असून पर्यावरणाचा -हास करत हा व्यावसाय सुरु असून रक्षकच भक्षक बनल्याने कारवाई कोण करणार.
2018 नंतर रेती उत्खनन करण्यासाठी परवाने नाहीत .
2018 नंतर रेती काढण्यासाठी सरकारने आणि संबंधित यंञणेने परवाने दिले नाहीत. मग रेती उत्खनन करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर काम सुरू असून सरकारी अधिकारी यांच्या कृपाआशीर्वादाने हा व्यावसाय सुरू आहे.