प्रतिनिधी / पेडणे
हरमल येथी डिओ जी .ए 03 ऐ. जे 4322 दुचाकी वाहनाचा अपघात एक विदेशी महिला पर्यटक चालत असता त्याला हरमल बेकरीजवल धडक दिली ,अपघात होताच घटनास्थळी दुचाकी सोडून पळाला ,हा अपघात 9 रोजी घडला होता ,त्या संधरबात शिबु माणिक पश्चिम बंगाल या युवकाला अटक 11 रोजी अटक केले.
त्या वेळी काही स्थानिक व्यक्तींनी स्कूटरच्या स्वाराचा व्हिडिओ शूट केला होता. त्याच्या शरीरावर देखील जखम झाली होती आणि हाच व्हिडिओ पेडणे पोलिसांनी पाहिला होता. पुढे पोलीस निरीक्षक जिवाबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले. आणि या संबंधात जवळच्या आरोग्य केंद्रात वॉच ठेवण्यात आले होते. पुढे 11 रोजी संशयित व्यक्ती जिल्हा रूग्णालया म्हापसा गेला असता, पोलिसांनी त्याला पकडण्यात यश मिळविले. नंतर त्यांच्यावर योग्य ते उपचार केले 9 रोजी अपघात झाला होता . त्या अपघातातील वाहन आपण शापोरा येथून डीओ स्कूटर चोरी केल्याची माहिती दिली. 11 रोजी पेडणे पोलिस त्याला अटक केली .
संशयित शिबू / माणिक मंडळ, वय 31 आर / ओ हसनाबाद, घोष, पश्चिम बंगाल सध्या फुटबॉल मैदान वागातोर अंजुना येथे वास्थव्य करत आहे .
चौकशीदरम्यान आणखी बाईक सापडल्याची पोलिसांना आशा आहे . पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, रूपेश कोरगावकर , फटी नाईक , महेश नाईक , जीवन गोवेकर आदींनी कारवाई केली