ऑनलाईन टीम / प्रेटोरिया :
दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला लागून असलेल्या पेरू या देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने 9 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पेरूमध्ये आतापर्यंत 9 लाख 04 हजार 911 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 34 हजार 529 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
पेरूमध्ये रविवारी 2 हजार 408 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 53 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 8 लाख 27 हजार 613 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. 42 हजार 769 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 1041 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत पेरू हा देश जगात अकराव्या स्थानी आहे. पेरूमध्ये आतापर्यंत 45 लाख 37 हजार 540 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.