अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 18 फेब्रुवारी 2022, सकाळी 11.50
● जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचा तुटवडा
● दुसरा डोस घेणारांची परवड
● परिक्षार्थी विद्यार्थ्यांना डोस गरजेचा
● 24 तासात 41 रूग्ण वाढले
● आठ तालुक्यात एक अंकी वाढ
● दोन तालुके कोरोनामुक्तीकडे
● 1632 संशयितांच्या चाचण्या
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीची संख्या 50 च्या खाली घसरली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1632 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून 2.51 पर्यंत पॉझिटिव्हीटी रेट खाली घसरला आहे. दरम्यान जिल्ह्यात एका बाजुला कोरोना रूग्णांची संख्या दखलपात्र अशी घसरली असताना दुसरीकडे कोव्हॅक्सिन लसीचा तुटवडा असल्याचे चित्र जाणवत आहे. यावर जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
कोवॅक्सिनचा दुसरा डोस लांबतोय
शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस योग्य वेळेत मिळणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाने आत्तापर्यंत लसीकरणाचे अगदी नेटके नियोजन केले आहे. मात्र सध्या कोव्हॅक्सिन लसीचा काही भागात तुटवडा जाणवत आहे. परिक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना लसीचा दुसरा डोस आवश्यक आहे. दुसरा डोस मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची धावपळ सुुरू आहे.
पॉझिटिव्हीटी रेट 2.51 वर घसरला
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख घसरला आहे. शुक्रवारच्या अहवालात पॉझिटिव्हीटी रेट 2.51 वर घसरला आहे. त्यानुसार कराड तालुक्यात 8 रूग्ण, खंडाळा तालुक्यात 3, खटाव तालुक्यात 4, कोरेगाव तालुक्यात 4, माण तालुक्यात 2, पाटण तालुक्यात 2, फलटण तालुक्यात 4, सातारा तालुक्यात 10, वाई तालुक्यात 3 इतर जिल्ह्यातील 1 असे 41 रूग्ण नव्याने वाढले आहेत.
शुक्रवारी जिल्हय़ात
नमुने-1632
बाधित-41
शुक्रवारपर्यंत जिल्हय़ात
नमुने-25,45,440
बाधित-2,78,735
मृत्यू-6,655
मुक्त-2,70,169