मुंबई
लोहखनिजाच्या किमतीत वाढीने भारतीय पोलाद कंपन्यांनी पोलादाच्या किंमतीत 1 डिसेंबरपासून वाढ केली असल्याचे समजते. पोलादाच्या किंमतीत टनामागे 2500 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. हॉट रोलड् कॉइलच्या किंमती तर दोन वर्षाच्या उच्चांकी स्तरावर पोहचल्या असून यात या महिन्यात आणखी वाढीचा अंदाज सांगितला जात आहे. जेएसडब्ल्यू स्टील व जिंदाल स्टील यांनी पोलादाच्या किंमती टनामागे 2 हजार 500 ते 2 हजार 700 रुपये इतक्या वाढवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही पोलादाच्या किंमती वाढलेल्या आहेत.