प्रतिनिधी / करमाळा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्ररीवरुन करमाळा पोलिस स्टेशनमधील पोलिस नाईक गोरख आप्पाराव ढाकणे याने 20 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यात 35 वर्षाच्या महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिस नाईक गोरख आप्पाराव ढाकणे (वय 35) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याची पडताळणी झाल्यानंतर याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तक्रारदार महिलेला तक्रारी अर्जाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यासाठी ढाकणे यांनी 20 हजार रुपये लाच मागितली होती.
या पार्श्वभुमिवर सहाय्यक पोलिस आयुक्त संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, अर्चना स्वामी, पोलिस नाईख प्रमोद पकाले, अतुल घाडगे, शाम सुरवसे यांच्या पथकाने सापळा लावून ही कारवाई केली.पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, सुरज गुरव, अपर पोलिस अधीक्षक, सुहास नाडगौडा यांनी यासाठी मार्गदर्शन केले.