प्रतिनिधी/ पणजी
देशाबरोबरच राज्यातही कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असल्याने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर मोठय़ाप्रमाणात कामाचा ताण वाढला आहे. पोलीस निरीक्षक व त्यांच्यावरचे अधिकारी संपूर्ण दिवसात केवळ तीन तास विश्रांती घेत असल्याचे एका पोलीस अधिकाऱयांनी सांगितले आहे. कुटुंबाला वेळ देणे शक्यच नाही. आपल्या वैयक्तिक गोष्टींनाही तिलांजली देऊन केवळ जनतेच्या हितासाठी पोलीस अधिकारी दिवसरात्र कार्यरत आहेत. पोलिसांना त्यांच्या कामाची पावती देणे काळाची गरज असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात 22 मार्चपासून जारी पेलेल्या लॉकडाऊनच्या काळात पोलीस दिवसरात्र रस्त्यावर डय़ुटी बजावत आहेत. रस्त्यावर डय़ुटी बजाविणाऱया पोलिसांवर देखरेख करण्यासाठी पोलीस अधिकारी रात्रंदिवस पहारा देत आहेत. काळच आणीबाणीचा असल्याने अधीक्षकांपासून ते सर्वच पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरून डय़ुटी बजावत असल्याचे दिसून येत आहेत. पहाटे 5.30 वाजता डय़ुटीवर असलेले पोलीस अधिकारी रात्री 2च्या दरम्यान घरी जायला निघतात व पुन्हा पहाटे 5.30 च्या दरम्याने डय़ुटीवर हजर राहत असल्याचे दिसून येत आहे.
गोवा पोलिसांबरोबरच सीआरपीएफ पोलीसही कार्यरत आहेत. पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या खालील म्हणजे पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक, हवालदार तसेच कॉन्स्टेबल हे कर्मचारी आळीपाळीने डय़ुटी बजावत असले तरी त्यांच्यावर देखरेख करणारे निरीक्षक, उपअधीक्षक व अधीक्षक पोलीसही दिवस रात्र डय़ुटी बजावत असल्याचे दिसून येत आहेत. सध्या देशात सुरु असलेल्या संकटाचे गांभीर्य लोकांना अद्याप तरी माहीत नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱया लोकांवर पोलीस कारवाई करीत असल्याने लोक पोलिसांबरोबरच हुज्जत घालीत आहेत. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. पोलीस आपल्यापरीने सर्व काही सोपस्कार पूर्ण करीत आहेत मात्र लोक त्यांना योग्य सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे.