प्रतिनिधी / जयसिंगपूर
राजश्री शाहू महाराजांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या जयसिंगपूर नगरीमध्ये व्यापार व शिक्षण संस्थांमुळे नावलौकिक प्राप्त झाला आहे. या शहरांमध्ये नेहमीच शांतता लावते म्हणूनच अलीकडच्या काळात गुन्हेगारांना सुद्धा जयसिंगपूर शहर सुरक्षित वाटू लागले आहे. उदगांव येथील चेकनाका व पोलिस मदत केंद्रं चौकीमुळे गुन्हेगारी व अवैध वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होईल. जयसिंगपूर व व उदगाव या चेक नाक्यावर लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील त्यामुळे गुन्हेगारी व अवैध वाहतुकीला आळा बसेल .कोरोना काळात पोलिस, सामाजिक संस्था, आरोग्यं विभागा, तालुका प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी पुढकार घेतल्यामुळे शिरोळ तालुका कोरोनामुक्त झाला आहे. उदगांवच्या या चेकनाक्या ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे याचा जिल्हयाला मोठा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
उदगांव (ता.शिरोळ) कायमस्वरूपी पोलिस मदत केद्रं व चेकनाका पोलिस चौकीचा शुभारंम मान्यवराच्या हस्ते करंण्यात आला पोलीस मदत केंद्र उभारणीस मदत केलेल्या क्रीडा इ सदस्यांसह. जिल्हा बंदीच्या काळात पोलिसांना सहकार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख म्हणाले, उदगांवपासुन कोल्हापूर जिल्हाची सीमा सुरु होते. गुन्हेगारी व जिल्हयाची सुरक्षा ठेवण्यासाठी उदगांव येथील चेकनाका महत्वाची कामगिरी बजाविली आहे. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरुपी चेकनाका पोलिस मदत केंद्रासाठी एक अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले आहे. तर याठिकाणी पोलिसांची कमरता भासणार नाही यांची नोंद पोलीस प्रशासन घेणार आहे. त्यामुळे उदगांवचा चेकनाका महत्वाची भुमिका बजाविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डीवायएसपी किशोर काळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासुन उदगांव ग्रामस्थानी याठिकाणी पोलिस चौकी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार याठिकाणी पोलिस मतद केंद्रं स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हेगारी निंयत्रणात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अप्पर पोलिस अघिक्षक श्रीनिवास घाटगे, तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ, डॉ. पी.आर. खटावकर, जि.प.सदस्य अशोकराव माने, गणेश बेकरीचे चेअरमन आण्णासाहेब चकोते, पं.स.सदस्य मन्सुर मुल्लाणी, जयसिंगपूरच्या नगराघ्यक्ष डॉ. निता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, उदगांवच्या सरपंच सलमा मुजावर, दशरथ काळे, विनोद घोडावत अण्णासो चकोते नगरसेवक बजरंग खामकर, महेश कलकुटगी, राहुल बंडगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.