वार्ताहर/ माशेल
पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाच्या पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघातर्फे घेण्यात आलेल्या पोस्टर पेंटींग स्पर्धेसाठी राज्यातून शारदा इंग्लीश हायस्कुलच्या आठवीचा विद्यार्थी यश यदुवीर कुंडईकर याची ‘ब’ गटातून दिल्ली येथे अंतिम फेरीत निवड झाली होती. भारतातील 41 लाखाहून जास्त मुलांतून 100 स्पर्धकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा नुकतीच दिल्ली येथील कॉन्स्टिटय़ूशन क्लब ऑफ इंडिया येथे झाली.
अंतिम फेरीत यश कुंडईकरने चौथा क्रमांक पटकावून यश संपादन केले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास डायरेक्टर ऑफ टेरीचे डॉ. सुनील पांडे, कॉलेज ऑफ आर्टच्या डॉ. सुमिता खतरिया उपस्थित होते. चित्रकला शिक्षक रामचंद्र नार्वेकर यांच्याकडून यशला मार्गदर्शन लाभले.