साहित्य : 1 वाटी जाड पोहे, दीड वाटी दूध, पाव वाटी साखर, पाव चमचा वेलची पावडर, 2 चमचे तूप, चिमुटभर केशरकाडय़ा, चिमुटभर काळीमिरी पावडर, पाव वाटी सुकामेवा (बदाम, मनुका, काजू)
कृती : केशरकाडय़ा चमचाभर दुधात भिजत घालाव्यात. बदाम दहा मिनिटे कोमट पाण्यात ठेवून नंतर बदाम सोलून त्याचे पातळ काप करावेत. पोहे मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत परतवून घ्यावेत. थोडय़ाशा गरम तुपात सुकामेवा परतवून घ्यावा. त्याच कढईत आणखी थोडे तूप गरम करून त्यात दूध ओतून एकसारखे ढवळत गरम करावे. भाजलेले पोहे मिक्सरला भरडसर लावून घ्यावे. पोह्याची ही भरड गरम दुधात घालून एकसारखी ढवळत शिजवून घ्यावी. मिश्रण एकजीव झाले की त्यात साखर आणि केशरकाडय़ा घालून मिश्रण मिक्स करावे. वरून वेलची पावडर आणि काळीमिरी पावडर टाकावी. आता तयार पोहा केशर सुकामेव्याने सजवून खाण्यास द्या.
टीप : दुधाऐवजी पाणी व केशर ऐवजी खाण्याचा रंग वापरु शकता.