ऑनलाईन टीम / कोलकाता :
निवडणूक आयोगाने घातलेल्या प्रचारबंदीच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकात्यातील गांधी मूर्ती समोर धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. चिथावणीखोर विधानामुळे सोमवारी निवडणूक आयोगाने बॅनर्जी यांना 24 तास प्रचार बंदी घातली आहे. बॅनर्जी 12 एप्रिल रात्री 8 ते 13 एप्रिल रात्री 8 पर्यंत प्रचार करू शकत नाहीत.
ममता बॅनर्जी यांनी रायदिघीमध्ये एका रॅलीत म्हटले होते की, माझ्या अल्पसंख्याक भाई-बहिणींनो मी तुमच्याकडे विनंती करते की, भाजपकडून पैसे घेणाऱ्या सैतानांचे ऐकू नका. ते हिंदू -मुस्लिमांमध्ये भाजपच्या सांगण्यावरून दरी निर्माण करतील. आपले अमूल्य मत त्यांना देऊ नका. भाजप सत्तेत आल्यास आपले मोठे नुकसान होईल.
या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने बॅनर्जी यांना 7 आणि 8 एप्रिलला नोटीस पाठवली होती. मात्र, त्यांनी माफी मागितली नव्हती.