देशातील 6 व्या क्रमांकाची बनली कंपनी – समभागांची उच्चांकी झेप
वृत्तसंस्था/ मुंबई
हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. (एचडीएफसी) कंपनीचे बाजारमूल्य प्रथमच 5 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. या कामिगिरीसोबत कंपनीने देशातील सहाव्या नंबरची सर्वात मोठी कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि इन्फोसिस कंपन्यांचेही बाजारमूल्य 5 लाख कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती आहे.
बीएसईमधील समभाग नवीन उंची प्राप्त करत 2,808 रुपये भावावर राहिले आहेत. समभाग मार्च महिन्यातील सर्वात नीचांकी पातळीनंतर सध्या 90 टक्क्यांच्या वेगाने वधारले आहेत. कंपनीला डिसेंबर तिमाहीत 2,930 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. निव्वळ व्याजाची रक्कमेतून होणारी कमाई ही 25 टक्क्यांनी वधारुन चार हजार कोटींवर राहिली आहे.
बाजारमूल्यात रिलायन्स अव्वल
बजारमूल्याच्या स्पर्धेत देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वोच्च स्थानी आहे. कंपनीचे बाजारमूल्य 13.02 लाख कोटी रुपये आहे. यांच्या व्यतिरिक्त टीसीएसचे बाजारमूल्य 12.05 लाख कोटी रुपये आणि एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य 8.75 लाख कोटी रुपये असल्याची नेंद करण्यात आली आहे.