Pranic Healing ही पूरक उपचार पद्धती आयुष्यातल्या प्रत्येक समस्येसाठी आपल्याला मदत करते. Pranic Healing च्या मदतीने आपण शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच नातेसंबंधातील समस्या सोडवू शकतो. Pranic Healing चा बिझनेसमध्ये आपल्याला कसा वापर करून घेता येईल याविषयी आजच्या लेखातून आपण माहिती घेणार आहोत.
जसं आपल्या ऊर्जावलयात दूषित ऊर्जा आली की आपल्याला आजार होतात अगदी त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी दूषित ऊर्जा असेल तर त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर होतो. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी आपल्याला खूप प्रसन्न वाटते तर एखाद्या ठिकाणी जाऊच नये असं वाटतं, असं का होतं? एखाद्या ठिकाणी ऊर्जा इतकी सकारात्मक असते की तिथे गेल्यावर आपल्याला खूप बरं वाटतं, शांतता वाटते. तर काही ठिकाणची ऊर्जा ही अत्यंत दूषित असते म्हणून तिथे आपल्याला जावंसं वाटत नाही.
उदा. एखाद्या मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं. तेच एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपल्याला मरगळ येते, उदास वाटतं. मंदिर आणि हॉस्पिटलमध्ये जाणवलेला हा फरक म्हणजेच तिथल्या ऊर्जाशक्तीचा प्रभाव आहे. याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपल्याला उदास वाटतं. काही हॉस्पिटल अशीसुद्धा असतात की तिथे आपल्याला चांगलं वाटतं अशा हॉस्पिटलचा उर्जास्तर खूप चांगला असतो. याचप्रकारे तुम्ही जिथे काम करता ती जागा सकारात्मक ऊर्जेने भरलेली असेल तर निश्चितच तिथे काम करायला तुम्हाला आवडेल. आता हे नेमकं करायचं कस?
pemeb ranic Healing मध्ये एखादा शारीरिक आजार बरा करताना जसं आपण जिथे दुखी असतो त्या जागेची ऊर्जास्वच्छता करतो अगदी त्याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथली दूषित ऊर्जा आपण स्वच्छ करायची. यानंतर त्या जागेला चांगल्या ऊर्जेने उर्जित करायचं. आता स्वच्छ नेमकं कसं करायचं, ऊर्जित कसं करायचं हे सर्व आपल्याला pranic healing च्या basic कोर्समध्ये शिकवलं जातं. आता जोपर्यंत आपण कोर्स शिकून घेत नाही तोपर्यंत आपण हे करूच शकत नाही असं आहे का? तर याच उत्तरं आहे, ‘नाही ’. आपण चंदनाच्या अगरबत्ती कामाच्या ठिकाणी लावून ऊर्जा स्वच्छता करू शकतो. त्यानेही उर्जास्तर वाढण्यास मदत होते. याव्यतिरिक्त आपण कामाच्या ठिकाणी Twin Heart Meditation म्हणजेच द्विह्रदय ध्यानसाधना करू शकतो. ही ध्यानसाधना नेमकी कशी करतात याबद्दल मागील काही लेखात माहिती दिलेली आहे. Twin Heart केल्याचा फायदा हा होतो की, तुमचं ऊर्जावलय स्वच्छ होतं, चांगली ऊर्जा तुमच्या अवतीभवती निर्माण होते. जेणेकरून तुमच्या संपर्कात येणारे लोकसुद्धा चांगल्या उर्जेचेच येतात.
आता या झाल्या वैयक्तिक व्यवसायाच्या ठिकाणी करायच्या गोष्टी. बरीच माणसं ही काही लोकांच्या हाताखाली काम करतात. ऑफिसमधील निर्णय ते स्वतः घेऊ शकत नाहीत. अशा लोकांनी नेमकं आपलं काम चांगलं व्हावं किंवा आपल्याला त्या कामाचा चांगला मोबदला मिळावा यासाठी काय करायचं ते बघुया. आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये उदास वाटत असेल, मरगळ येत असेल तर रोज सकाळी आवरून झाल्यानंतर Twin Heart Meditation करायचे आणि ते meditation करताना आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणची ऊर्जा स्वच्छ होतेय, चांगली ऊर्जा त्या ठिकाणी जास्तीत जास्त येतेय अशी कल्पना करायची. एक महिना नियमित हे केल्यावर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये झालेला बदल नक्की
जाणवेल.
ऑफिसच्या ठिकाणी सात जणांनी जर एकत्र meditation केलं तर त्याचा खूप चांगला आणि लवकर प्रभाव तुम्हाला जाणवेल. मास्टर चोआ नेहमी म्हणतात की एखाद्या ठिकाणी सात लोकांनी एकत्र Twin Heart Meditation केले तर वेगवेगळय़ा ठिकाणी शंभर लोकं बसून meditation केल्यावर जेवढी ऊर्जा येते तेवढीच ऊर्जा सात जणांनी एकत्र केलेल्या meditation ने येते. एवढय़ा प्रचंड ऊर्जेच्या स्रोताने विचार करा किती विलक्षण बदल त्याठिकाणी होत असेल ज्या ठिकाणी आपण सात जण meditation करणार आहोत.
ऊर्जा आणि आध्यात्मीक कायद्यांचा वापर करून, योजना, प्रकल्प आणि एकूण अंमलबजावणीसाठी सकारात्मक संस्थात्मक वातावरण तयार केले जाऊ शकते. साध्या तंत्रांचा वापर करून, व्यक्ती एक तीक्ष्ण मन विकसित करतील, अचूक निर्णय घेण्याची आणि गंभीर व्यावसायिक परिस्थितीची काळजी घेण्याची त्यांची क्षमता वाढवतील. Pranic Healing यासाठी नक्कीच मदत करू शकते. प्रमुख पदे भरण्यासाठी योग्य उमेदवार निवडण्यासाठी मदत होऊ शकते.
कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण करणारी परिस्थिती तुम्ही उत्तम पद्धतीने हाताळू शकता.
तुमच्या कर्मचाऱयांना शारीरिक आणि मानसिकरित्या त्वरित चार्ज करण्यास मदत करू शकता. तसेच Pranic Healing च्या मदतीने तुमचे व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध सुधारा.
-आज्ञा कोयंडे