प्रतिनिधी / सांगरूळ
ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला आरोग्यच्या सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्रे प्रमुख आधारवड आहेत. ही केंद्रे उपचारासाठी आवश्यक असणार्या आधुनिक साधनसामग्री ने परिपूर्ण असतील तर रुग्णांवर चांगले उपचार होतील. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेची सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले .सांगरूळ तालुका करवीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेल्या भेटीच्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना खासदार मंडलिक यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला खाजगी दवाखान्यातील उपचार आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपचारासाठी अवलंबून राहावे लागते.
जिल्हा परिषदेच्या निधीवर मर्यादा असल्याने उपचाराच्या महागड्या साधनांपासून काही प्राथमिक आरोग्य केंद्र वंचित आहेत .यामुळेअशा आरोग्य केंद्रात येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांवर वेळेत योग्य ते उपचार होत नाहीत. आरोग्य केंद्रात जर उपचाराची आधुनिक साधनसामग्री उपलब्ध असेल तर नागरिकांना ग्रामीण भागातच उपचाराचा लाभ मिळणार आहे .तसेच आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही रुग्णांवर उपचार करण्यात सुलभता येईल. यासाठी मी माझ्या खासदार फंडातून तसेच इतर अन्य सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन आरोग्य केंद्रांच्या मधून उपलब्ध असणाऱ्या उपचाराच्या साधनांची तसेच नव्याने गरज असणाऱ्या साधनांची माहिती जाणून घेतली आहे . या कामासाठी खासदार फंडातील एक कोटीचा निधी तसेच स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्काराचे तीस लाख असा निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त केला आहे .यापुढेही आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देऊन मतदार संघातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून ग्रामीण भागातील जनतेला चांगले
व्हावेत यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीस स्वागत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वैभव जाधव यांनी केले .व प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत खासदार मंडलिक यांना माहिती दिली. यावेळी अॅड. सुरेशराव कुराडे, केडीसी बँकेचे संचालक पी. जी शिंदे ,वैद्यकीय अधिकारी वैभव जाधव ,विनय कदम,दिलीप खाडे अनिल चौगले म्हारुळ राजाराम चाबूक, सर्जेराव खाडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी तसेच सदाशिवरावजी मंडलिक युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.