54व्या कोकण प्रदेश अधिवेशनात प्रस्ताव सादर झाल्याची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
नकुत्याच झालेल्या 54व्या कोकण प्रदेश अधिवेशनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काही प्रस्ताव मांडले असून त्यातले काही गोव्याशीही संबंधित आहे. गोव्यात संगीत महाविद्यालय तसेच गोवा कला महाविद्यालय एकच असल्याने दुरुन येणाऱया विद्यार्थ्यांना 2 ते 3 तास प्रवास करावा लागतो. त्यांच्यासाठी सरकारतफ्sढर्क वसतीगृहाची सोय आवश्यक आहे. गोवा विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप नसावा. प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे असे प्रमुख प्रस्ताव गोव्याशीही संबंधित असल्याची माहिती कोकण प्रांत सहमंत्री प्रभा नाईक यांनी दिली.
अखिल भारतीय विद्यार्थी प्ररिषदेतफ्xढ घेण्यात येणाऱया पत्रकार परिषदेत यावेळी कोकण प्रदेश कार्यका†िरणी सदस्य हृषिकेश शेटगांवकर आणि कोकण प्रांत तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्य संयोजक उद्देश नाईक देसाई यांची उपस्थिती होती. नारिकत्व दुरुस्ती कायद्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपले समर्थन दाखवले आहे.
प्रभा यांनी अन्य प्रस्तावही सादर केले. त्या म्हणाल्या की, म्हादई समस्येवर लवकर तोडगा काढावा, पॅसिनोचे नरवाने रद्द करावे, ड्रग्ज विरोधी सर्व कायदे लागू व्हावे, रस्त्यांची परिस्थिती वाईअ असून ती सुधारावी आणि गोव्यातील रेल्वेचे दोन रुळ करावे जेणेकरुन रेल्वे येण्यास उशिर होणार नाही.
शेटगांवकर यांनी सांगितले की, जेएनयूची सेंट्रल इन्फ्ढाsरमेशन सिस्टम एआयएसए आणि एफ्ढएसआय यांनी मिळून फ्ढाsडली आहे. विद्यार्थ्यांना सेमिस्टर देण्यास अडथळा यावा यासाठी हे करण्यात आले होते. परंतु जेएनयुने ती सिस्टम लवकर दुरुस्त करुन सेमिस्टरसाठी नोंदणी सुरु केली. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 15 सदस्यांना मारहाण झाली. या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. तसेच हिंदु रक्षा दल यांनी हे सगळे आपण केल्याचे मान्य केले. असे होते तर हे मान्य करण्यास दिवस का लागले. याचाच अर्थ ही संस्थाही याच विरोधकांनी तयार केल्याचेही ते म्हणाले.