निर्माता रिची मेहतासोबत भागीदारी
जागतिक अभिनेत्री ठरलेली प्रियांका चोप्रा ही ‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये सध्या चर्चेत आहे. प्रियांकाने आता ‘दिल्ली क्राइम’चे निर्माते रिची मेहता यांची आगामी सीरिजमध्ये काम करण्यास होकार दर्शविल्याचे समजते. ही एक पीरियड ड्रामा सीरिज असून यात प्रियांका महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
2019 मध्ये प्रदर्शित ‘दिल्ली क्राइम’च्या यशानंतर मेहता आता भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर सीरिज निर्माण करणार आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महिलांवर ही सीरिज आधारित असेल. यातील एका भूमिकेसाठी मेहता यांनी प्रियांकाशी संपर्क साधला होता.
प्रियांका लवकरच ‘सिटाडेल 2’, ‘हेड्स ऑफ स्टेट’ आणि हिंदी चित्रपट ‘जी ले जरा’मध्ये दिसून येणार आहे. तर प्रियांकाने रिची मेहता यांची सीरिज स्वीकारली असल्यास भारतीय प्रेक्षकांना तिच्या अभिनयाची जादू पुन्हा पाहता येणार आहे. प्रियांकाचा ‘लव्ह अगेन’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे.