दोडामार्ग / वार्ताहर:
आदर्श गाव केर येथील फरा प्रतिष्ठान तर्फे भव्य ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 3 हजार रू., द्वितीय पारितोषिक 2 हजार रु. तर तृतीय पारितोषिक 1 हजार रुपये आहे. शिवाय प्रशस्तीपत्रक व इतरही अनेक वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या अभंग गायन स्पर्धेत भाग घेण्यासाठी 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असून प्रवेश फी 100 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत- अभंग कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 7 मिनिटांचा संत रचित असावा, व्हिडीओमध्ये गायकाबरोबर पखवाज, तबला, हार्मोनियम इत्यादी साथीदार समाविष्ट होऊ शकतात, अभंग इतर कोणत्याही स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा, व्हिडिओमध्ये स्पर्धकाचे नाव, व्हिडिओ बनवतानाची तारीख, पत्ता व अभंगाचे नाव सांगणे बंधनकारक आहे, स्पर्धकांनी आपला व्हिडिओ कोणत्याही यु ट्यूब चॅनेलवर अपलोड न करता पाठवावा, सर्व स्पर्धकांचे व्हिडिओ आमच्या यु ट्यूब चॅनेलवर प्रसारित होतील, तसेच व्हिडिओ पाठविण्याची शेवटची मुदत 31 ऑगस्टपर्यंत आहे. स्पर्धेचा निकाल 19 सप्टेंबर रोजी म्हणजेच अनंत चतूर्थी दिवशी जाहीर करण्यात येणार आहे. बक्षिसेही ऑनलाईन पाठविण्यात येणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 9168321314 या नंबरवर गुगल पे व फोन पे द्वारे जमा करावेत. अधिक माहितीसाठी प्रसाद गोसावी (9168321314) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत अनेकांनी सहभागी व्हावे असे आवाहन फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी सरपंच प्रेमानंद देसाई यांनी केले आहे.