प्रतिनिधी / फलटण :
फलटण शहर पोलिसांनी सोमवार पेठेतील एका घरात छापा टाकून चाळीस हजार रुपये किंमतीचा आठ किलो गांजा हस्तगत केला आहे. याप्रकरणी एका दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलीस पथकाने दिनांक 8 रोजी 3:20 वाजण्याच्या सुमारास सोमवार पेठ फलटण येथील संजय रावबा गायकवाड (वय-58 वर्षे) व पत्नी पंचशीला संजय गायकवाड (वय-54 वर्षे दोन्ही (रा. सोमवार पेठ फलटण) यांच्या राहत्या घरी छापा टाकून 8 किलो गांजा जप्त केला. घरातील किचनमध्ये एका पोत्यात हा गांजा आढळला असून, एकूण मालाची किंमत 40 हजार 101 रूपये आहे.
महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली शामकांत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गायकवाड दाम्पत्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.