फलटण / प्रतिनिधी :
फलटण तालुक्यातील एका गावात दोन बालिकांवर त्याच गावातील एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना 26 जुलैला दुपारी घडली. याप्रकरणी आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण तालुक्यातील एका गावात 26 जुलै रोजी दुपारी 2 च्या सुमारास 7 वर्ष 9 महिने व 4 वर्ष वयाच्या बालिकांना भेळ खाण्यास देण्याचे अमिष दाखवून आरोपीने दोन्ही बालिकांना आपल्या घरी आणले. दरम्यान, आरोपीने बालिकांना विवस्त्र करुन त्यांच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कोणालाही न सांगण्याची तंबी दिली. आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भारत किंद्रे करीत आहेत.