ऑनलाईन टीम / पोर्तो :
फायझरची कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर पोर्तुगीजमधील महिला आरोग्य सेविकेचा 48 तासात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोर्तुगीजमधील स्थानिक माध्यमांनी यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
सोनिया असेवेडो असे मृत्यू झालेल्या 41 वर्षीय महिला आरोग्य सेविकेचे नाव आहे. त्या पोर्तुगीज इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये कार्यरत होत्या. 30 डिसेंबर रोजी ही लस देण्यात आली. तिच्यामध्ये लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवले नव्हते. तरीही तिचा एक जानेवारीला मृत्यू झाला.
सोनिया यांचे वडील अबिलियो असेवेडो यांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तिला लस घेण्यापूर्वी कोणताही आजार नव्हता. मात्र, लस घेतल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे कारण मला संबंधित संस्थेकडून जाणून घ्यायचे आहे.