यकृत, पॅनक्रिया आणि मूत्रपिंड यांना मजबुती देण्याचे काम चक्रासन करते. हृदयाला उर्जा मिळते. वंध्यत्व, अस्थमा आणि ऑस्टियोपोरोसिस या आजारांमध्ये खूप फायदा होतो.
- या आसनाच्या अभ्यासातून पाठीचा कणा, पाठ, खांदे, हात, पायांची हाडे आणि स्नायू लवचिक आणि मजबूत होतात. पचनसंस्था चांगली राहाण्यासाठी या आसनाचा खूप फायदा होतो.
- स्थूलता कमी करणे आणि अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठीही या आसनाची मदत होते.
- हे आसन करण्यासाठी सुरूवातीला पाठीवर झोपावे. त्यानंतर दोन्ही हात मागे नेत कोपर्यात वाकवत दोन्ही हात जमिनीवर ठेवावे. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवावे.
- हळुहळु नितंब वर उचलावेत मग हळुहळु कंबरेच्या वरचे शरीरही उचलावे. शरीराचा धनुष्याकार तयार होईल.
- या स्थितीत 5 ते 20 श्वास रोखावेत. जितके शक्य होईल तितकाच सराव करावा.