प्रतिनिधी/ सातारा
रूग्णालयांना आग लागण्याच्या घटना समोर येत असल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात ठोस उपाय योजना करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर फायर ऑडिटचा प्लान तयार करण्यात येत आहे. यानुसार रूग्णालयाच्या परिसरात पाईप टाकण्यात येणार आहेत. म्हणून डांबरीकरणाचे काम थांबवल्याची माहिती ठेकेदार सचिन नलवडे यांनी दिली.
जिल्हा शासकीय रूग्णालयात आठ-नऊ वर्षांनी डांबरीकरणाच्या कामाला मुहूर्त मिळाला होता. डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. खड्डी चे ढिग लागले होते. खड्डे मुजवण्यात येते होते. मात्र गेल्या काही दिवसापासून या कामाला अचानक बेक लागल्याने रूग्णालयात येणाऱया रूग्णांची आणि नातेवाईकांची कसरत सूरू आहे. रूग्णालयाच्या प्रवेशद्वारात खड्डीचा ढिग असल्याने यावून वाहनांचे चाक घसरत आहे. तर दुचाकी पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात रूग्णालयांना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक निष्पाप जीव अशा घटनामध्ये जीव गमवत आहेत. यामुळे प्रशासनाने रूग्णालयांना फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा रूग्णालयाचे ही फायर ऑडिट होणार आहे. त्यांचा आराखडा तयार होणार आहे. त्यानुसार पाईप टाकण्यात येणार आहेत. यामुळे डांबरीकरणाचे काम थांबवले आहे. या पाईप टाकण्याआधी डांबरीकरण केले तर पुन्हा रस्त्याचे खोदकाम करावे लागेल अशी माहिती नलवडे यांनी दिली आहे.