विन डीजलचा चित्रपट 25 जूनला झळकणार
हॉलिवूडमधील प्रसिद्ध ‘फास्ट अँड फ्यूरियस-9’ चित्रपट 25 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासंबंधी माहिती अभिनेता आणि निर्माता विन डीजल याने स्वतःच समाजमाध्यमांवर चित्रपटाचा टीजर प्रसारित करत दिली आहे. ‘फायनली ब्लेस्ड अँड ग्रेटफुल’ असे टिप्पणीही त्याने केली आहे.
दिग्दर्शक जस्टिन लिन यांच्या या चित्रपटात डब्ल्यूडब्ल्यूई रेस्लर आणि अभिनेता जॉन सीना, अभिनेत्री मिशेल रोड्रिग्ज, जोर्डाना ब्रियुस्टर, नताली इमॅन्युएल, हेलेन मिरेन, चार्लीज थेरॉन, अभिनेता सुंग कांग, टायरिस गिबस आणि लुडाक्रिस हे देखील दिसून येणार आहेत. हा चित्रपट यापूर्वी मे 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोना संकटामुळे याचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले होते.