प्रतिनिधी / म्हापसा
गोव्याचे सुपुत्र व पोंबुर्फा गावचे नागरिक वामन पंढरी भोसले (89) हे सोमवारी पहाटे मुंबई गोरेगाव येथे आपल्या निवास्सथानी अल्प आजाराने मरण पावले. ते वयाचे 17 वर्षाचे असताना गोवा सोडून नोकरी निमित्त मुंबईला गेले होते. तेथे लवकर ते गुरुदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये सामील झाले. त्यांनी सुमारे 100 हून अधिक फिल्म एडिटींग केले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, पुत्र विकास व 3 मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.मुंबई येथे याच दिवशी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले.