वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरीस
अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय माजी फुटबॉलपटू दियागो मारडोना सोमवारी रूग्णालयात दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसापासून मारडोनाच्या प्रकृतीची तपासणी वारंवार केली जाते. मारडोनाच्या सर्व नियमित वैद्यकीय चांचण्या घेतल्या जाणार असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ब्युनोस आयरीस शहरातील ला प्लेटा येथील खासगी रूग्णालयात मारडोनाला त्याच्या कुटुंबियानी दाखल केले होते. मारडोनाच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.