वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
जग प्रसिद्ध सेशल मीडियामधील कंपनी फेसबुकने आता कोविड19 च्या वाढत्या संसर्गामुळे आणि कर्मचाऱयांच्या सुरक्षेसाठी आगामी पाच ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी 50 टक्के कर्मचाऱयांकरीता वर्क फ्रॉम होमची योजना आखण्यात येणार असून यातील 25 टक्के कर्मचाऱयांच्या मदतीने कार्यालये सुरु ठेवण्यात येणार असल्याची घोषणा फेसबुकचे सीईओ झुकरबर्ग यांनी केली आहे.
सदरचे जे कर्मचारी कार्यालयामधून काम करणार आहेत, ते जे दुर्गम व अन्य ठिकाणाहून येतात त्यांना वर्क फ्रॉम होमच्या सुविधेमुळे मदत होणार आहे. ही योजना एक जानेवारीनंतर प्रारंभ होणार आहे. चालू वर्षात पूर्णपणे काम वर्क फ्रॉम होमची योजना लागू करुन संबंधीत कर्मचाऱयांना वेतनही त्याच ठिकाणी देण्याची योजना आखण्यात येणार आहे.
कर्मचाऱयांची लहान शहरांना पसंती
फेसबुकच्या इंटरनल सर्वेक्षणामध्ये कर्मचारी एका ठिकाणांहून अन्य ठिकाणी जाण्यास तयार असल्याचे समोर आले आहे. यामध्ये 60 टक्के कर्मचाऱयांनी ही तयारी दर्शवली आहे, अशी माहिती मार्केट वॉचच्या माहितीमधून देण्यात आली आहे.