प्रतिनिधी /फोंडा
फोंडा भाजपा मंडळातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. भाजपातर्फे बलिदान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यावेळी दक्षिण गोव्याचे माजी खासदार व एनआरआय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर, फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी, उपनगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, नगरसेवक रितेश नाईक, आनंद नाईक, भाजपाचे पदाधिकारी सुनील देसाई, संदीप खांडेपारकर, मनोहर आडपईकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
श्यामाप्रसाद मुखर्जी हे सच्चे देशभक्त होते. देशाच्या विभाजनानंतर काश्मिर प्रांताला लागू करण्यात आलेल्या 370 कलमाला त्यांनी सर्वात आधी विरोध केला. त्यासाठी त्यांना बलिदान पत्करावे लागले. भाजपासाठी ते प्रेरणास्थान आहेत, असे ऍड. नरेंद्र सावईकर यावेळी बोलताना म्हणाले. भाजपाच्या अन्य पदाधिकाऱयांनीही यावेळी मुखर्जी यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.