32 हजार ते 1 लाखापर्यंत सवलत- अनेक मॉडेल्सवर वेगवेगळी सवलत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फोक्सवॅगन इंडियाने जूनमध्ये आपल्या काही कार्सवर सवलत देण्याची घोषणा केली आहे. काही कार्सवर ग्राहकांना अगदी 1.33 लाख रुपयेपर्यंत रोख सवलत मिळणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
कंपनीने आपल्या संकेतस्थळावर यासंदर्भात सविस्तर स्पष्टता दिली आहे. काही कार मॉडेलवर ग्राहकांना सवलतीचा अनुभव घेता येणार आहे. कंपनीच्या पोलो आणि वेंटो या कार्सवर 1.33 लाख रुपये इतकी सवलत मिळणार आहे. कंपनी याजोडीला लवकरच आपल्या नव्या टीगॉन आणि टायगुन या गाडय़ा बाजारात दाखल करणार आहे, असे सांगितले जाते. पोलो आणि वेंटो या गाडय़ा विक्रीत आघाडीवर असून या गाडय़ांवर 32 हजार 500 ते 1.33 लाख रुपयांपर्यंत सवलत ग्राहकांना मिळणार आहे. कंपनीने कारच्या एक्सशोरूम किंमतीत घट केली असल्याचे म्हटले आहे. विक्रेते आणि शहरांनुसार सवलतीची किंमत बदलू शकते असे कंपनीने म्हटले आहे. फोक्सवॅगनने मागच्या काही दिवसात प्रिमीयम पोलो ही ऑटोमेटीक ट्रान्स्मीशनची गाडी सादर केली होती, जिची 8.51 लाख रुपये इतकी किंमत असणार आहे.
केणत्या कारवर किती सवलत मिळणार आहे ते पाहु
गाडी किंमत
पोलो 1.0 एमपीआय
पोलो ट्रेंडलाइन नॉन मेटालिक. 32 हजार 500 रुपये
पोलो कम्फर्टलाइन नॉन मेटालिक 17 हजार रुपये
पोलो 1.0 टीएसआय
पोलो कम्फर्टलाइन टीसीआय नॉन मेटालिक 17000 रुपये
पोलो हाईलाइन प्लस एमटी…. 15 हजार रुपये
पोलो हाईलाइन प्लस एटी…… 1 हजार रुपये
पोलो जीटी…………………….. 20 हजार 900 रुपये
वेंटो
वेंटो हाईलाइन प्लस एमटी….. 1 लाख 33 हजार रु.
वेंटो हाईलाइन एटी…………… हजार रुपये
वेंटो हाईलाइन प्लस एटी 64 हजार रुपये