वृत्तसंस्था/ मार्सेली
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या एटीपी टूरवरील पुरूषांच्या मार्सेली खुल्या टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या रिचर्ड गॅसकेटने एकेरीत विजयी सलामी देताना मायकेल येमेरचा पराभव केला.
पहिल्या फेरीतील सामन्यात गॅसकेटने येमेरचा 6-4, 7-5 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. अन्य एका सामन्यात सातव्या मानांकित इव्हासिकाने स्लोव्हेकियाच्या गोम्बॉसचा 7-6 (7-5), 6-3, इटलीच्या स्टीफेनो ट्रेव्हेगेलियाने स्वीसच्या लेकसोनेनचा 6-2, 6-7 (5-7), 7-6 (7-1) असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले.