टायर थ्री शहरात 65 टक्के मागणी वाढली, तांत्रिक प्रगती व उपकरणांची योग्य मदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वॉलमार्टच्या मालकीच्या असलेल्या फ्लिपकार्टला विपेत्यांच्या संख्येमध्ये गेल्या वषीच्या तुलनेमध्ये 35 टक्के अधिक वाढ दिसली आहे. त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला अनेक ग्राहक आणि विपेत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाकाळात एकंदरच ऑनलाइन कंपन्यांच्या उत्पादनांना उत्तम प्रतिसाद लाभल्याचे आपण पाहिले आहे. छोटय़ा शहरातही ऑनलाइन वस्तुंच्या मागणीने वाढीव नोंदणी दर्शवली आहे. यात फ्लिपकार्टने सर्वात जास्त करून विक्रीत बाजी मारल्याचे स्पष्ट होते आहे. अगदी टायर टू शहरातही फ्लिपकार्टला चांगली कामगिरी करता आली आहे. सामाजिक आंतर हीच खरी सुरक्षा मानून कोरोना कालावधीत अनेकांनी ऑनलाइन खरेदीला पसंती दर्शवली होती. अनेकांनी गर्दीच्या ठिकाणी खरेदीसाठी जाणे टाळले होते. त्यामुळेच या कोरोनाच्या लॉकडाऊनचा फायदा ऑनलाइन विक्री मोहिमेला झाला.
यंदा ऑनलाइन विक्री करणाऱया ई-कॉमर्स कंपन्यांनी व्यवसायात चांदी करून घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तांत्रिक प्रगती आणि नव्या उपकरणांच्या साथीने ई-कॉमर्स कंपन्यांना ऑनलाइन व्यवसायामध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळवता येत आहे. ग्राहकांचे समाधान करतानाच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील व्यावसायिकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मची चांगली मदत झाली आहे. लॉकडाउननंतर कंपनीचा विकास 50 टक्के इतका झाला असून टायर थ्री शहरांमध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत फ्लिपकार्टचा व्यवसाय 65 टक्क्मयांनी सुधारल्याचे दिसले आहे. 2020 मध्ये विपेत्यांच्या संख्येमध्ये 35 टक्के इतकी वाढ झाली असल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे. घरगुती वस्तू. डेस, सौंदर्यप्रसाधने, खेळणी अशा अनेक वस्तूंना मागणी दरम्यानच्या काळात नोंदवली होती.