कोलकाता / वृत्तसंस्था
बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या एका अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू आहे. या अभिनेत्रीचे नाव देवदत्त बॅनर्जी ऊर्फ आर्या असे आहे. आर्या ही दिवंगत सितारवादक निखिल बॅनर्जी यांची मुलगी आहे. कोलकात्याच्या दक्षिण भागातील राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळली आहे. ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली होती. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिवाकर बॅनर्जी यांच्या ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. शास्त्रीय संगीतामध्ये तिने पदव्युत्तर पदवी घेतली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा दार ठोठावूनही आतून काही उत्तर न आल्याने घरकाम करणाऱया व्यक्तीने शेजाऱयांना बोलावले. बऱयाच वेळापासून घर बंद असल्याने शेजाऱयांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी दार उघडताच देवदत्त तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली. तिच्या नाकावर रक्ताचे काही डाग होते. पण त्याव्यतिरिक्त शरीरावर कुठलीही दुखापत झाली नव्हती. देवदत्तला एसएसकेएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल’’, अशी माहिती पोलिसांनी दिली.