ऑनलाईन टीम / सिडनी :
ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिल यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपहरणकर्त्यांनी 14 एप्रिल रोजी सिडनी येथील स्टुअर्ट यांच्या राहत्या घरात घुसून त्यांना बंदुकीचा धाक दाखवला, तसेच जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर दुसऱ्या शहरात नेऊन त्यांना धमकावत मारहाण केली. एक तासानंतर अपहरणकर्त्यांनी स्टुअर्ट यांची सुटका केली. 20 एप्रिलला या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. तपसाअंती ऑस्ट्रेलिया पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.
स्टुअर्ट मॅकगिल यांचा ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूंमध्ये समावेश आहे. ते माजी फिरकी गोलंदाज आहेत. त्यांनी 1998 ते 2008 या कालावधीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या लेग स्पिनर्समध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. 2008 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.