ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज पहाटे चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नाही. त्याच्या ताब्यातील एक एके-47 रायफल आणि पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.
या चकमकीदरम्यान, पळून गेलेल्या दुसऱ्या दहशतवाद्याला ख्रेव येथे अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे. तसेच एका ट्रक चालकालाही अटक करण्यात आल्याचे आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले.