आर्थिक गुन्हा शाखेची कारवाई, आणखी सहा जणांचा शोध सुरू
प्रतिनिधी / मिरज
कोल्ड स्टोरेजमध्ये तारणावर ठेवलेल्या बेदाण्याची परस्पर विक्री करून बडोदा बँकेच्या मिरज शाखेला 17 कोटीचा गंडा घालणाऱ्या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. याबाबत बडोदा बँक मिरज शाखेच्या व्यवस्थापकांनी 8 नोव्हेंबर 2020 रोजी मिरज शहर पोलिसांत आठ संशयितां विरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करीत होते.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये जितेंद्र शंकर दयाळ (रा. समतानगर, मिरज) आणि मुसा आयुब मोमिन (रा. सावर्डे ता. हातकणंगले, सध्या रा. मिरज) या दोघांचा समावेश आहे. या प्रकरणातील आणखी सहाजण पसार आहेत. सदर आठ जणांनी बनावट चलन करून बडोदा बँकेत बेदाणा तारण गहाण ठेवून त्यावर कर्ज काढले होते. कर्ज मंजूर होताच तारणावर असलेला सर्व बेदाणा परस्पर विक्री करून बडोदा बँकेच्या मिरज शाखेला 16 कोटी 97 लाख रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणातील एकूण आठ संशयितांपैकी दोघांना सध्या दोघाना अटक झाली असून आणखी सहा जणांचा शोध सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.