60 टक्के मतदारसंघांमध्ये मतविभागणी होण्याची चिन्हे
सातत्याने बदलत असलेल्या समीकरणांमुळे आता पश्चिम उत्तरप्रदेशात मायावती यांच्या पक्षाचे जातीय गणित महत्त्वाचे ठरणार आहे. प्रारंभिक दोन टप्प्यांमधील मतदारसंघांमध्ये भाजप, सप आघाडी आणि बसपने स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत. यातील 26 मतदारसंघांमध्ये तिन्ही पक्षांचे उमेदवार आहेत. अशा ठिकाणी बसपकडून सप आघाडीला मोठे नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे. 15 मतदारसंघांमध्ये बसपमुळे सपची समीकरणे बिघडली आहेत. तर 6 मतदारसंघांमध्ये थेट लढत होणार आहे. तर 4 मतदारसंघांमध्ये बसप उमेदवारामुळे भाजपला फटका बसणार आहे.
कैराना मतदारसंघ
या मतदारसंघात भाजपच्या मृगांका मागील निवडणुकीत नाहिद हसनकडून पराभूत झाल्या होत्या. यंदाही समीकरण हेच आहे. बसपने ब्राह्मण चेहरा उभा केल्याने सप-रालोदचे नाहिद हसन यांची बहिण इकराला थेट लाभ मिळण्याची चिन्हे आहेत.
यावेळचे उमेदवार
मृगांका सिंह भाजप
इकरा सप-रालोद
राजेंद्रसिंह उपाध्याय बसप
जातीय समीकरण ः कैरानामध्ये मुस्लिम अधिक असून यात गुर्जर देखील आहेत. त्यानंतर कश्यप आणि जाट इत्यादींचा क्रम लागतो. मुस्लीम मते विभागली जात नसल्याने मुस्लीम उमेदवार सहजपणे जिंकून येऊ शकतात. मतविभागणी झाली तरच हिंदूधर्मीय उमेदवार विजयी होऊ शकतो.
एकूण मतदार ः 2,99,980
ब्राह्मण ः 11 हजार (3.5 टक्के)
मुस्लीम ः 1,24,120 (42.19 टक्के)
गुर्जर ः 25 हजार (11 टक्के)
कश्यप ः 34 हजार (11.65 टक्के)
अनुसूचित जाती ः 36 हजार (12.15 टक्के)
क्षत्रिय ः 4,800
वैश्य ः 7000
2017 चा निकाल
सपचे नाहिद हसन विजयी झाले, त्यांना 98,830 मते मिळाली
भाजपच्या मृगांका सिंह यांना 77,668 मते प्राप्त
रालोदचे अनिल कुमार यांना 19,992 मते
बसप उमेदवार दिवाकर देशवाल यांना 6,888 मते
शामली मतदारसंघ
यंदाचे उमेदवार
तेजेंद्र सिंह निर्वाल भाजप
प्रसन्न चौधरी सप-रालोद
ब्रिजेंद्र मलिक जाट बसप
जातीय समीकरण
जाट 70 हजार
मुस्लीम 65 हजार
कश्यप 25 हजार
गुर्जर 20 हजार
ब्राह्मण 12 हजार
वैश्य 30 हजार
दलित 45 हजार
2017 चा निकाल
भाजपचे तेजेंद्र निर्वाल विजयी. 70,085 मते मिळाली होती.
काँग्रेसचे पंकज कुमार मलिक यांना 40,365 मते
रालोदच्या बिजेंद्र सिंह यांना 33,551 मते
बसपचे मोहम्मद इस्लाम यांना 17,114 मते
बुढाना मतदारसंघ
यावेळचे उमेदवार
उमेश मलिक भाजप
राजपाल बालियान सप-रालोद
हाजी मोहम्मद अनीश बसप
जातीय समीकरण ः बुढाना मतदारसंघात एकूण 3,30,066 मतदार आहेत. या मतदारसंघात मुस्लीम मतदार सर्वाधिक आहेत. त्यांची संख्या 70 हजार तर जाटव समुदायाची मते 30 हजार इतकी आहे. जाट मते 25,765 आहेत. तर ब्राह्मण मते 25500 आणि गुर्जर मते 31,800 इतकी आहेत. सैनी 4,432 आणि प्रजापति 2,100 तसेच कश्यप समुदायाची 28 हजार मते आहेत. अन्य समुदायाची मतेही लक्षणीय आहेत.
2017 चा निकाल
भाजपचे उमेश मलिक विजयी, 97781 मते प्राप्त
सपच्या प्रमोद त्यागी यांना 84,580 मते मिळाली
बसपच्या सईदा बेगम यांना 30,034 मते प्राप्त
रालोदच्या योगराज सिंह यांना 23,732 मते प्राप्त
चरथावल मतदारसंघ
यंदाचे उमेदवार
सपना कश्यप भाजप
पंकज मलिक सप-रालोद
सलमान सईद मुस्लीम बसप
जातीय समीकरण ः मुजफ्फरनगर जिल्हय़ातील चरथावल मतदारसंघात सुमारे 3 लाख 15 हजार मतदार आहेत. या मतदारसंघाच्या जातीय समीकरणांच्या आधारावर मुस्लीम, कश्यप, जाट आणि ठाकूर समुदायाची मते सर्वाधिक आहेत. मुस्लीम मते 1 लाख तर चर्मकार समाजाची 55 हजार मते आहेत. कश्यप समुदायाची 30 हजार आणि जाट समुदायाची 30 हजार मते आहेत. ठाकूरांची मते 20 हजारांच्या आसपास आहेत.
2017 चा निकाल
भाजपचे विजय कुमार कश्यप यांना 82,046 मते मिळाली.
सपचे मुकेश कुमार चौधरी यांना 58,815 मते प्राप्त
बसपच्या नूर सलीम राणा यांना 47,704 मते मिळाली
रालोदच्या सलमान जैदी यांना 14442 मते प्राप्त
पुरकाजी मतदारसंघ
यावेळचे उमेदवार
प्रमोद उटवाल भाजप
अनिल कुमार सप-रालोद
सुरेंद्र पाल सिंह बसप
जातीय समीकरण ः मुजफ्फरनगर जिल्हय़ातील पुरकाजी मतदारसंघात सुमारे 3 लाख 14 हजार मतदार आहेत. यात मुस्लीम, जाट, चर्मकार, गुर्जर आणि त्यागी समुदायाची मते आहेत. सुमारे 1 लाख मुस्लीम, 60 हजार चर्मकार तर 25 हजार जाट मतदार आहेत. याचबरोबर तेथे पाल, ब्राह्मण, त्यागी आणि ठाकूर मतदारही लक्षणीय संख्येत आहेत.
2017 चा निकाल
भाजपचे प्रमोद उटवाल विजयी, 77,481 मते प्राप्त
काँग्रेसच्या दीपक कुमारांना 66,238 मते
बसपच्या अनिल कुमारांना 46,401 मते
रालोदच्या छोटी यांना 8227 मते
खतौली मतदारसंघ
यंदाचे उमेदवार
विक्रम सैनी भाजप
राजपाल सिंह सैनी सप-रालोद
माजिद सिद्दीकी बसप
जातीय समीकरण ः मतदारसंघात 77 हजार मुस्लीम, 57 हजार चर्मकार, 27 हजार सैनी, 19 हजार पाल आणि सुमारे 17 हजार कश्यप मतदार आहेत. याचबरोबर तेथे गुर्जर, प्रजापति, जाट, ठाकूर आणि वैश्य मतदारही अधिक संख्येत आहेत.
मागील निकाल
भाजपचे विक्रम सिंह विजयी, 94,771 मते
सपच्या चंदन सिंह चौहानांना 63397 मते
बसपच्या शिवन सिंह सैनींना 37,380 मते
मीरापूर मतदारसंघ
मुजफ्फरनगर जिल्हय़ातील हा मतदारसंघ सपसाठी अनुकूल आहे. रालोदसोबत आघाडी झाल्याने सपला लाभ होणार आहे. येथे एकूण 2,73,236 मतदार आहेत.
जातीय समीकरण ः येथे मागास समुदायाची 35 टक्के मते आहेत. जाट गुर्जर, झोझा (मुस्लीम), कश्यप आणि पाल समुदायाचे प्रमाण अधिक आहे. बसपने मुस्लीम उमेदवार उभा केला आहे. भाजप आणि सप यांच्यात थेट लढत होईल.
यावेळचे उमेदवार
चंदन चौहान सप-रालोद
प्रशांत गुर्जर भाजप
मोहम्मद शालिम बसप
मागील निकाल
भाजपचे अवतार सिंह भडाना विजयी, 69035 मते प्राप्त
सपच्या लियाकत अली यांना 68842 मते
बसपच्या नवाजिश आलम यांना 39689 मते
रालोदच्या उमेदवाराला 22751 मते
लोनी मतदारसंघ
यंदाचे उमेदवार
नंदकिशोर गुर्जर भाजप
मदन भैया सप-रालोद
हाजी आकिल चौधरी बसप
जातीय समीकरण ः गाजियाबाद जिल्हय़ातील या मतदारसंघात सुमारे 4 लाख 55 हजार मतदार आहेत. सर्वाधिक मते जाट शेतकरी आणि मुस्लीम समुदायाची आहेत. त्यानंतर पूर्वांचलमधील लोक आणि ब्राह्मण, गुर्जर, त्यागी, दलित, वाल्मिकी आणि गढवालांसह अन्य ओबीसी मतदार देखील आहेत.
मुस्लीम 90 हजार, पूर्वांचली 40 हजार, गुर्जर 35 हजार, ब्राह्मण 30 हजार, दलित 30 हजार, वाल्मिकी समुदाय 23 हजार, त्यागी समुदाय 18 हजार, वैश्य 15 हजार, गढवाली 18 हजार मतदार आहेत.
मुरादनगर मतदारसंघ
यावेळचे उमेदवार
अजित पाल त्यागी भाजप
सुरेंद्र कुमार मुन्नी सप-रालोद
हाजी अय्यूब इदरीशी बसप
जातीय समीकरण
जाट 55 हजार
मुस्लीम 45 हजार
ब्राह्मण 40 हजार
दलित 45 हजार
पंजाबी 20 हजार
यादव 17 हजार
वैश्य 17 हजार
ओबीसी 75 हजार
मोदीनगर मतदारसंघ
यंदाचे उमेदवार
मंजू सिवाज भाजप
सुदेश वर्मा सप-रालोद
पूनम गर्ग बसप
जातीय समीकरण ः गाजियाबाद जिल्हय़ातील मोदीनगर मतदारसंघात सुमारे 3 लाख 30 हजार मतदार आहेत. येथे ओबीसी 1 लाख 25 हजार, जाट 50 हजार, मुस्लीम 50 हजार, ब्राह्मण 35 हजार, दलित 30 हजार आणि वैश्य 25 हजार मतदार आहेत.
धौलाना मतदारसंघ
यंदाचे उमेदवार
धर्मेश तोमर भाजप
अस्लम चौधरी सप-रालोद
वासिद प्रधान बसप
जातीय समीकरण ः हापुड जिल्हय़ातील या मतदारसंघात सुमारे 3 लाख 80 हजार मतदार आहेत. येथे मुस्लीम 1 लाख 50 हजार, ठाकूर 70 हजार, दलित 50 हजार, ब्राह्मण 20 हजार, यादव 8 हजार, जाट 7 हजार आणि इतर 45 हजार आहेत.
जेवर मतदारसंघ
जेवर मतदारसंघात मागील 9 निवडणुकांमध्ये प्रत्येकी तीनवेळा काँग्रेस, बसप आणि भाजपला विजय मिळाला आहे. येथे 59 टक्क्यांहून अधिक शहरी मतदार आहेत. मागील निवडणुकीत मुख्य लढत बसप आणि भाजप यांच्यात दिसून आली होती.
यंदाचे उमेदवार
धीरेंद्र सिंह भाजप
अवतार सिंह भडाना सप-रालोद
नरेंद्र भाटी डाडा बसप
जातीय समीकरण ः मतदारसंघात गुर्जर, मुस्लीम आणि अनुसूचित जातीचे मतदार अधिक आहेत. याचबरोबर ठाकूर समुदायाचेही येथे प्रभाव दिसून येतो. मागील निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला गुर्जर, ठाकूर आणि जाट मतदारांचा पाठिंबा मिळाला होता.
ठाकूर 60 हजार
गुर्जर 85 हजार
वैश्य 20 हजार
अनुसूचित जाती 70 हजार
मुस्लीम 85 हजार
जाट 35 हजार
इतर 80 हजार
मागील निकाल ः भाजपचे उमेदवार धीरेंद्र सिंह विजयी झाले. त्यांना 1 लाख 02 हजार 979 मते मिळाली. तर बसप उमेदवाराला 80,806 मतेच मिळू शकली. समाजवादी पक्षाचा उमेदवार तिसऱया तर रालोदचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिला.
स्याना मतदारसंघ
यावेळचे उमेदवार
देवेंद्र सिंह लोधी भाजप
दिलनवाज खान सप-रालोद
सुनील भारद्वाज बसप
जातीय समीकरण ः बुलंदशहर जिल्हय़ातील या मतदारसंघात 3 लाख 70 हजार मतदार आहेत. जातीय समीकरणानुसार येथे मुस्लीम आणि दलित मतदार प्रभावी आहेत. लोधी, ब्राह्मण, ठाकूर आणि वैशय मतदारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मुस्लीम 52 हजार, जाटव 50 हजार, वाल्मिकी समुदाय 5 हजार, लोधी समुदाय 70 हजार, कश्यप 15 हजार, ब्राह्मण 30 हजार, ठाकूर समुदाय 45 हजार, वैश्य 10 हजार, गुर्जर 17 हजार, जाट 38 हजार तर प्रजापति समुदायाची 10 हजार मते आहेत.
शिकारपूर मतदारसंघ
यंदाचे उमेदवार
अनिल शर्मा भजप
किरण पाल सिंह सप-रालोद
मोहम्मद रफीक बसप
जातीय समीकरण ः बुलंदरशहर जिल्हय़ातील मतदारसंघात सुमारे 3 लाख 10 हजार मतदार आहेत. जातीय समीकरणानुसार हा ब्राह्मणबहुल मतदारसंघ आहे. जाट मतदारही प्रभावी भूमिकेत आहेत. तर दलित, मुस्लीम, ठाकूर समुदायाची मतेही महत्त्वाची मानली जातात.
खैर मतदारसंघ
यंदाचे उमेदवार
अनूप प्रधान भाजप
भगवती प्रसाद सूर्यवंशी रालोद-सप
प्रेमपाल सिंह बसप
जातीय समीकरण ः मतदारसंघात सुमारे 3 लाख 75 हजार मतदार आहेत. येथे 1 लाख 10 हजार जाट, 50 हजार ब्राह्मण, 45 हजार जाटव, 25 हजार मुस्लीम, 20 हजार ठाकूर, 13 हजार गडरिया आणि 13 हजार वैश्य मते आहेत. इतर समुदायांची 5 हजार मते आहेत.
मागील निकाल
भाजपचे अनूप प्रधान विजयी, 1 लाख 24 हजार 198 मते
बसपचे राकेश कुमार मौर्य यांना 53477 मते
रालोदचे ओमपाल सिंह यांना 41 हजार 888 मते
बरौली मतदारसंघ
यंदाचे उमेदवार
ठाकूर जयवीर सिंह भाजप
प्रमोद गौड सप-रालोद
नरेंद्र शर्मा बसप
जातीय समीकरण ः मतदारसंघात 3 लाख 55 हजारांच्या आसपास मतदार आहेत. येथे 30 हजार मुस्लीम, 3 हजार वैश्य, 27 हजार ब्राह्मण, 66 हजार ठाकूर, तर 22 हजार जाट, 5 हजार कुंभार समुदायाचे, 45 हजार लोधी, 1 हजार यादव, 20 हजार गडरिया, 43 हजार जाटव मतदार आहेत.
मागील निवडणूक
भाजपचे दलवीर सिंह विजयी, 122545 मते प्राप्त
बसपचे ठाकूर जयवीर सिंह यांना 86782 मते
काँग्रेसचे नीरज शर्मा यांना 1829 मते
कोल मतदारसंघ
यंदाचे उमेदवार
अनिल पराशर भाजप
सलमान सईद सप-रालोद
मोहम्मद बिलाल बसप
जातीय समीकरण ः सुमारे 3 लाख 60 हजार मतदार आहेत. 1.25 लाख मुस्लीम, 60 हजार ब्राह्मण, 50 हजार दलित, 50 हजार ठाकूर, 35 हजार वैश्य, 13 हजार बघेल, 13 हजार सिंधी, 13 हजार पंजाबी मतदार आहेत.
मागील निवडणूक
भाजपचे अनिल पराशर विजयी, 93814 मते
सपचे शाज इशाक यांना 42851 मते
काँग्रेसच्या विवेक बंसल यांना 38623 मते
इगलास मतदारसंघ
इगलास मतदारसंघात भाजपचे राजकुमार सहयोगी आमदार आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व चौधरी चरण सिंह यांच्या पत्नी आणि मुलीने केले आहे. याचमुळे रालोदने जाट समुदायाला स्वतःच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळचे उमेदवार
राजकुमार सहयोगी भाजप
वीरपाल सिंह दिवाकर सप-रालोद
सुशील कुमार बसप
जातीय समीकरण ः हा मतदारसंघ जाटबहुल आहे. येथे सुमारे 1 लाख जाट मतदार आहेत. तर 80 हजार ब्राह्मण मतदार आहेत. 50 हजार अनुसूचित जातीचे, 30 हजार बघेल आणि 20 हजार वैश्य मते आहेत.
मागील निकाल
भाजपचे राजकुमार सहयोगी विजयी, 1 लाख 28 हजार मते
बसपच्या राजेंद्र कुमार यांना 53200 मते
छाता मतदारसंघ
यंदाचे उमेदवार
चौधरी लक्ष्मी नारायण भाजप
तेजपाल सिंह सप-रालोद
सोनपाल सिंह बसप
जातीय समीकरण ः मतदारसंघात 90 हजार जाट, 70 हजार ठाकूर, 45 हजार ब्राह्मण, 30 हजार जाटव, 15 हजार मुस्लीम, 15 हजार गुर्जर, 15 हजार वाल्मिकी समुदायाचे 15 हजार बघेल तर अन्य जातींचे 50 हजार मतदार आहेत.
मागील निकाल
भाजपचे चौधरी लक्ष्मी नारायण विजयी. 117537 मते
अपक्ष अतुल सिंह यांना 53699 मते
गोवर्धन मतदारसंघ
यावेळचे उमेदवार
मेघश्याम सिंह भाजप
प्रीतम सिंह सप-रालोद
राजकुमार रावत बसप
जातीय समीकरण ः या मतदारसंघात सुमारे 3 लाख 10 हजार मतदार आहेत. येथे 80 हजार ठाकूर, 40 हजार जाटव, 50 हजार ब्राह्मण, 50 हजार जाट, 35 हजार ओबीसी, 25 हजार वैश्य आणि 10 हजार मुस्लीम मते आहेत.
मागील निकाल
भाजपचे करिंद सिंह विजयी. 93538 मते
बसपच्या राजकुमार रावत यांना 60529 मते
बलदेव मतदारसंघ
यंदाचे उमेदवार
पूरनप्रकाश भाजप
बबीता देवी सप-रालोद
अशोक कुमार सुमन बसप
जातीय समीकरण ः मतदारसंघात सुमारे 3 लाख 50 हजार मतदार आहेत. येथे 1 लाख 5 हजार जाट, 60 हजार अनुसूचित जातीचे, 50 हजार ब्राह्मण, 40 हजार सैनी, 40 हजार बघेल, 40 हजार यादव मतदार आहेत.
मागील निवडणूक
भाजपचे पूरन प्रकाश विजयी, 8841 मते प्राप्त
रालोदच्या निरंजन सिंह यांना 75203 मते
खैरागढ मतदारसंघ
यंदाचे उमेदवार
भगवान सिंह कुशवाह भाजप
रौतान सिंह सप-रालोद
गंगाधर सिंह कुशवाह बसप
जातीय समीकरण ः येथे सुमारे 3 लाख 9 हजार मतदार आहेत. येथे 75 हजार ठाकूर, 65 हजार ब्राह्मण, 20 हजार जाट, 20 हजार जाटव आणि 10 हजार मुस्लीम मतदार आहेत.
मागील निकाल
भाजपचे महेश कुमार गोयल विजयी, 93510 मते प्राप्त
बसपचे भगवान सिंह कुशवाह यांना 61511 मते