स्टील 15 दिवसात 50 टक्क्यांनी वाढ
कोल्हापूर प्रतिनिधी
बांधकाम साहित्यामध्ये रोजच्यारोज दर वाढ होत असल्यांने बांधकाम व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. बांधकाम खर्चाचा दर प्रती चौरस फुटामागे 2000 ते 2200 रूपयावरून, आता 2500 ते 2800 रुपयापर्यंत पोचला आहे. ही दरवाढ परवडणारी नसल्याने घरांच्या किंमतीमध्ये प्रती चौरस फूटामागे 400 ते 500 रुपयांनी वाढ होण्याची शक्य़ता क्रिडाई, कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱया कालावधीमध्ये झालेला लॉकडाऊन व इतर देशांतर्गत व जागतिक निर्बंध याचा मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. सद्यपरिस्थितीत वाढत चाललेले जागतिक निर्बंध, डिझेल व पेट्रोल दरातील भरमसाठ वाढ, कोळशाची टंचाई, रॉ मटेरियल, आयातीत होणारी दिरंगाई या सर्व बाबींचा फटका बांधकाम साहित्य उत्पादकांना बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने स्टीलच्या दरामध्ये 90 टक्के सिमेंट 48ìkeÌkesÀ, व्हीटीफाईड टाईल्स 33 टक्के, ऍल्युमिनियम 88 टक्के अशी भरमसाठ वाढ झाली आहे. केंद्रीय स्तरावर याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास बांधकाम क्षेत्राचा विस्तार रखडणार आहे. यामुळे सर्व सामान्यांचे गृहस्वप्न साकार होणे कठीण होणार आहे. शिवाय बांधकाम क्षेत्राशी निगडीत इतर 200 ते 250 पूरक व्यावसायीक अडचणीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे शासन सर्वांसाठी घरे उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे या बांधकाम साहित्यांच्या दरवाढीवर कोणतेच नियंत्रण नसल्याचे दिसून येते. ज्या ग्राहकांनी याआधी फ्लॅटचे बुकींग केले आहेत. त्यासर्व सदनिकाधारकांवर कोणतीही दरवाढ न करता मुदतीत फ्लॅट ताब्यात देण्याचे बंधन मात्र विकासकावर आहे. तरी आता भविष्यातील बांधकाम साहित्यातील दरवाढीमुळे सदनिकांच्या किंमतीत 300 ते 500 रूपयापर्यंत दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर,सचिव प्रदिप भारमल,खजानिस गौतम परमार,सहसचिव श्रीधर कुलकर्णी, सहखजिनदार पवन जामदार,संचालक कृष्णात खोत,गणेश सावंत,लक्ष्मीकांत चौगुले उपस्थित होते.
वर्षभरात बांधकाम साहीत्याच्या दरात झालेली वाढ
बांधकाम साहीत्य मार्च 2021 मार्च 2022 टक्केवारी वाढ
स्टील प्रती मॅट्रीक टन रू.45000 86000 90
सिमेंट बॅग रू 250 370 48
व्हिट्रीफाईड टाईल्स चौ. फूट रू. 45 60 33
ऍल्युमिनियम किलो रू. 180 340 88
पीव्हीसी प्लबिंग पाईप्स —- —— 25
वाळू प्रती ब्रास रू. 5500 7500 36
सॅनिटरी वेअर —– ——- 30
हार्डवेअर,पेंटस ——— —- 30
Aमजुरी —- ——– 25 ते 30