सेन्सेक्स 345 अंकांनी घसरला : बजाज फायनान्स नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारामधील मागील पाच दिवस सुरु असलेल्या सलगच्या तेजीच्या प्रवासाला अखेर विराम लागला आहे. चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी अखेर चढ उताराचा व्यापार करत 346 अंकांची घसरण नोंदवत सेन्सेक्सचा बाजार बंद झाला आहे. जागतिक पातळीवरील कमजोर वातावरणामुळे सेन्सेक्समध्ये समाधानकारक हिस्सेदारी राखणाऱया रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि टीसीएसमधील घसरणीने बाजारातील वातावरण दबावात राहिले आहे.
प्रमुख कंपन्याच्या मदतीने सेन्सेक्स तेजीसोबत सुरु झाला होता. परंतु दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 596.26 अंकांनी घसरला. दिवसअखेर 345.51 अंकांनी घसरुन निर्देशांक 36,329.01 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 93.90 अंकांनी घसरुन 10,705.75 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील दिग्गज कंपन्यांमध्ये सर्वाधिक 4 टक्क्मयांनी नुकसानीत बजाज फायनान्सचे समभाग राहिले आहेत. यासोबत एशियन पेन्ट्स, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, मारुती सुझुकी आणि इन्फोसिस यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. इंडसइंड बँक, स्टेट बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील आणि आयटीसीचे समभाग तेजीत राहिले आहेत.
जागतिक शेअर बाजारामधील घसरणीचा प्रभाव अखेर भारतीय शेअर बाजारावर पडल्याने बाजारात बुधवारी घसरणीचे सत्र राहिले. जगभरात कोविड19 च्या वाढत्या रुग्णांमुळे गुंतवणूकदारांमधील वाढती चिंता हे शेअर बाजाराच्या पडझडीचे कारण ठरले असल्याचे म्हटले जात आहे. भारतासह जागतिक स्तरावर कोरोनाचा परिणाम बाजारावर होतो आहे. अन्य बाजारांमध्ये चीनमधील शांघाय तेजीत राहिला, तर जपानचा टोकीयो आणि दक्षिण कोरियाचा सोलचा बाजार नुकसानीत राहिला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरल्याचे पाहायला मिळाले.