वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या मे महिन्यात होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणामध्ये भारताचे नरिंदर बात्रा यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2016 साली झालेल्या निवडणुकीत बात्रा यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली होती. आता या फेडरेशनच्या अध्यक्षपदासाठी बात्रा दुसऱयांदा निवडणूक लढविणार आहेत. नरिंदर बात्रा हे भारतीय ऑलिंपिक समितीचे विद्यमान अध्यक्ष तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला यापूर्वीच प्रारंभ झाला आहे. 12 फेब्रुवारीपासून इच्छुकाकडून अर्ज पाठविण्यास प्रारंभ करण्यात आला असून 12 मार्च ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख राहील.