एकसंबा, कोगनोळीत घरगुती गणरायाचे विसर्जन बाप्पाच्या नामाचा जयघोष : फटाक्मयांची आतषबाजी
वार्ताहर /एकसंबा
डोळय़ात आले अश्रू। बाप्पा आम्हाला नका विसरू।। आनंदमय करून चालला तुम्ही। पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही।। निरोप देतो आता देवा आज्ञा असावी। चुकले काही आमचे देवा क्षमा असावी… ।।गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषी लवकर या.. ! असे म्हणत एकसंबासह नणदी, नणदीवाडी, याद्यानवाडी, उळागड्डीवाडी, कल्लोळ, कोगनोळी परिसरामध्ये मंगळवारी सायंकाळी घरगुती गौरी व गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.
गेल्या पाच दिवसांपासून गणरायाची मनोभावी पूजा अर्चा करुन मंगळवारी लाडक्मया गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. एकसंबा परिसरामध्ये सायंकाळी 4 नंतर गौरी व गणपतीचे ओढे, विहिरी, कृष्णा व दूधगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. यंदा ओढय़ाला पाणी असल्याने बहुतांश भाविकांनी ओढय़ात मूर्ती विसर्जन करणे पसंद केले. यावेळी गणरायाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. निसर्गाचा होणारा कोप व कोरोना सारख्या विषाणूचा लवकर नायनाट होऊ दे व बळीराजा सुखी राहू दे ! अशी प्रार्थना करण्यात आली.
कोगनोळीतील गणपतीचे विसर्जन उत्साहात
कोगनोळीसह परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, हंचिनाळ के. एस., आडी, बेनाडी, सुळगाव, मत्तीवडे, हदनाळ, आप्पाचीवाडी आदी भागात घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन उत्साहाने करण्यात आले.
सायंकाळी 4 वाजल्यापासून गौरी गणपतीचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची लगबग सुरु होती. गावाजवळ असणाऱया ओढे, नाले, तलाव, विहीर आदी ठिकाणी अबालवृद्धांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आरती करुन व फटाक्मयांची आतषबाजी करत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषी लवकर या, असा जयघोष करीत बाप्पांना निरोप देण्यात आला.
उगार येथे गणरायाला निरोप
गणरायाचा नामघोष करत मंगळवारी उगार खुर्द परिसरातील घरगुती मूर्तीचे विसर्जन उत्साहात करण्यात आले. काही नागरिकांनी तलाव, विहिर येथे मूर्ती विसर्जन केल्याचे पहावयास मिळाले. रेल्वे स्थानक, ऐनापूर, मंगसुळी, कुडची मार्गावरील भाविकांनी कृष्णा नदीत मूर्ती विसर्जनाला पसंती दिली. त्यामुळे गर्दी झाली होती. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांनी साध्यापद्धतीने उत्सव साजरा केल्याचे पहावयास मिळाले.