वृत्तसंस्था/ अल रय्यान, कतार
रॉबर्ट लेवान्डोवस्कीने नोंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर आफ्रिकन चॅम्पियन्स अल आहली क्लबचा पराभव करून बायर्न म्युनिचने क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. येत्या गुरुवारी युरोपियन चॅम्पियन्स टायगर्सविरुद्ध त्यांची जेतेपदासाठी लढत होणार आहे.
मेक्सिकोच्या टायगर्सने रविवारी झालेल्या उपांत्य सामन्यात ब्राझीलच्या पामीरास संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. 17 व्या मिनिटाला लेवान्डोवस्कीने पहिला गोल नोंदवून बायर्नला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामना संपण्यास चार मिनिटे असताना लेरॉय सेनने दिलेल्या अचूक क्रॉस पासवर लेवान्डोवस्कीने हेडरद्वारे संघाचा दुसरा गोल नोंदवत बायर्नचे अंतिम फेरीतील स्थानही निश्चित केले.