वार्ताहर/ कारदगा
बारवाड येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ड्रीम्स फाउंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम वसंत चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
बारवाड दूध संघावर आण्णासो चौगुले अध्यक्ष, रसूल मुल्ला उपाध्यक्ष, अजित कोल्हापुरे, संजय देसाई यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल, दादासो मुराळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार व पत्रकार रंगराव बन्ने यांना आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल, अरुण जोशी यांचा निवृत्तीनिमित्त, ग्रा. पं. वर आनंदा चौगुले, महादेव पाटील, तानाजी चौगुले, संगीता जाधव, माधुरी शिंदे, नीलम तिटवे, सुवर्णा जाधव, रत्नाबाई कोणे यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी साहिल जाधव या विद्यार्थ्यास शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली. वसंत चौगुले, पत्रकार रंगराव बन्ने, दादासो मुराळी, तानाजी चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पीकेपीएस चेअरमन शशिकांत अर्जुनवाडे, दादासो देसाई, विजय पाटील, राजकुमार देसाई, पांडुरंग चौगुले, सरदार मुल्ला, मारुती कोणे, रणजीत तिटवे, शिवाजी शिंत्रे, तात्यासो देसाई, गजानन जाधव, रामचंद्र चौगुले, भरत कोल्हापुरे, शांतीनाथ कोरुचे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष आप्पासो तिटवे, उपाध्यक्ष गिरीधर निगवे, धनाजी चौगुले, चंद्रकांत अर्जुनवाडे, प्रभाकर देसाई, जावेद मुल्ला, दादासो मुराळी, संजय चौगुले यांच्यासह बालगणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.