बेंगळूर : परीक्षेशिवाय बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येत असून निकाल मंगळवार दि. 20 रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. सायंकाळी 4 वाजता पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध केला जाणार आहे.
2020-21 या शैक्षणिक वर्षात बारावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या प्रेशर्स तसेच रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार जाहीर करणार आहेत. निकाल सायंकाळी 4 पासून http://karresults.nic.in/ या वेबसाईटवर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी यंदा परीक्षा न घेतल्याने शिक्षण खात्याने आपल्या वेबसाईटवर स्वतंत्रपणे रजिस्टर नंबर उपलब्ध करून दिले आहेत. याच्या आधारे निकाल जाणून घेता येईल. विद्यार्थ्यांनी हा रजिस्टर नंबर मिळविण्यासाठी http://pue.kar.nic.in या वेबसाईवर जाऊन Know my number या लिंकवर क्लिक करावे. तेथे जिल्हय़ाचे नाव व कॉलेजचे नाव निवडल्यानंतर नोंदणी क्रमांक मिळेल. हा क्रमांक निकाल जाहीर झाल्यानंतर वेबसाईटवर नमूद करून निकाल पाहता येणार आहे.
जिल्हय़ात 19 हजार 278 विद्यार्थी
बेळगाव :यावषी कोरोनामुळे 12 वीची परीक्षा रद्द झाली असली तरी मूल्यांकनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. बेळगाव जिल्हय़ात 19 हजार 278 फ्रेशर्स विद्यार्थी यावषी बारावीला होते. निकाल मंगळवारी असला तरी मागील महिन्याभरापासून पदवीपूर्व शिक्षण खात्याकडून याची अंमलबजावणी सुरू होती.