प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाकाळातही अंगणवाडी सेविका कोरोना योद्धय़ा म्हणून कार्यरत आहेत. सर्व्हे करण्यापासून आहारधान्याचे वितरण करण्यापर्यंत आपली भूमिका बजावताना दिसत आहेत. विशेषतः अंगणवाडीमध्ये करण्यात येणारे लसीकरण देखील नियोजित वेळेप्रमाणे करण्यात येत आहे. यामुळे 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरणाचा लाभ मिळत आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे महिन्यातील एक दिवस अंगणवाडीमध्ये लसीकरण करण्यात येते. यामुळे अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी याची माहिती देत सदर वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण केले जाते. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने लसीकरण प्रक्रिया राबविण्यात येत असून कोरोनाकाळातही या सेवेचा लाभ उपयुक्त ठरत आहे.